Course is available
हे वापरण्यास सोपे असे ई-लर्निंग मॉड्यूल तुम्हाला तुमच्या मुलासोबत घरी वापरण्यासाठी विविध पद्धती शिकवतील. या कोर्समध्ये तुम्हाला शिकण्याच्या आणि विकासाच्या संधी म्हणून दैनंदिन खेळ आणि घरगुती क्रियाकलाप कसे वापरावेत यावर मार्गदर्शन करण्यावर जास्त भर दिला गेला आहे. तुमच्या मुलाचे संवाद सुधारण्यासाठी त्यांची मदत कशी करावी, त्यांच्याशी कसे गुंतून राहावे आणि त्यांच्याशी संवाद कसा साधावा आणि सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन कसे द्यावे आणि त्यांना दैनंदिन जीवनात नवीन कौशल्ये कशी शिकवावीत यावर विशेष भर देण्यात आला आहे.
फोटो क्रेडिट: डब्ल्यूएचओ / ब्लिंक मीडिया - डी. वलेन्सिया
हा कोर्स पुढे नमूद केलेल्या इतर भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे:
English - हिन्दी, हिंदी - Èdè Yorùbá
हा कोर्स, विशेषत: संवाद आणि सामाजिक परस्परसंवादाच्या क्षेत्रातील विकासात विलंब किंवा अपंगत्व असलेल्या २ ते ९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. निदान आवश्यक नाही. काळजीवाहकांच्या सर्वांगीण आरोग्यात सुधार करण्यासोबतच मुलांचा संवाद, क्रीयाकालापांमधील सहभाग, सकारात्मक वर्तन आणि दैनंदिन जीवनात कौशल्य विकसित करण्याच्या संधी म्हणून, दैनंदिन खेळ आणि घरगुती नित्याक्रमाचा वापर करण्याची काळजी वाहकांची क्षमता वाढवणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. हा कोर्स विकासात्मक विलंब किंवा अपंगत्व असलेल्या मुलांच्या कुटुंबांसाठी डब्ल्यूएचओ चा काळजीवाहाकांसाठीचा कौशल्य ई-प्रशिक्षण कार्यक्रमावर आधारित आहे.
हा कोर्स कसा वापरावा कोर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी परिचयापासून सुरुवात करणे आणि नंतर क्रमाने मॉड्यूल पूर्ण करणे उपयुक्त ठरेल. याचे कारण म्हणजे कौशल्ये एकमेकांवर आधारित असतात. प्रत्येक मॉड्यूलसाठी, तुम्हाला तुमच्या मुलासोबत घरी सराव करण्यासाठी विशिष्ट कौशल्ये आणि पद्धती दिल्या जातील. तुम्ही दर ४ किंवा ५ दिवसांमध्ये एक मॉड्यूल पूर्ण करावे असे आम्ही सुचवतो जेणेकरून तुम्हाला त्या दरम्यान सराव करण्याची संधी मिळेल. याचा अर्थ अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी सुमारे २.५ महिने लागतील. तुम्ही लिखित क्रियाकलापांसाठी आणि योजना तयार करण्यासाठी आणि तुमच्या घरच्या सरावातून तुम्ही काय शिकलात याची नोंद करून ठेवण्यासाठी कोर्ससोबत दिलेले जर्नल वापरा. मॉड्युल्स तुम्हाला याबाबत मार्गदर्शन करतील. या कोर्सच्या "डॉक्युमेंट" विभागात उपलब्ध असलेले जर्नल तुम्ही प्रिंट करू शकता किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वापरू शकता. कोर्सच्या परिचयात आणि जर्नलमध्ये अतिरिक्त सूचना दिलेल्या आहेत.
अभ्यासक्रमाचा कालावधी: अंदाजे ८ तास.
प्रमाणपत्रे: परीक्षेनंतर किमान ८०% मिळवणाऱ्या सहभागींना कामगिरीचे प्रमाणपत्र जारी केले जाईल. ज्या सहभागींना कामगिरीचे प्रमाणपत्र मिळेल ते या कोर्ससाठी ओपन बॅज देखील डाउनलोड करू शकतात. कसे ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हा कोर्स "WHO eLearning Caregiver Skills Training for Families of Children with Developmental Delays or Disabilities", 2022 वरून मराठीत भाषांतरित करण्यात आलेला आहे. मजकूर किंवा भाषांतराच्या अचूकतेसाठी WHO जबाबदार नाही. इंग्रजी आणि मराठी भाषांतरात काही विसंगती आढळल्यास मूळ इंग्रजी आवृत्ती ही बंधनकारक आणि अस्सल आवृत्ती मानली जाईल.