विकासात्मक विलंब किंवा अपंगत्व असलेल्या मुलांच्या कुटुंबांसाठी डब्ल्यूएचओ चा काळजीवाहाकांसाठीचा कौशल्य ई-प्रशिक्षण कार्यक्रम (eCST)

हे वापरण्यास सोपे असे ई-लर्निंग मॉड्यूल तुम्हाला तुमच्या मुलासोबत घरी वापरण्यासाठी विविध पद्धती शिकवतील. या कोर्समध्ये तुम्हाला शिकण्याच्या आणि विकासाच्या संधी म्हणून दैनंदिन खेळ आणि घरगुती क्रियाकलाप कसे वापरावेत यावर मार्गदर्शन करण्यावर जास्त भर दिला गेला आहे. तुमच्या मुलाचे संवाद सुधारण्यासाठी त्यांची मदत कशी करावी, त्यांच्याशी कसे गुंतून राहावे आणि त्यांच्याशी संवाद कसा साधावा आणि सकारात्मक वर्तनाला प्रोत्साहन कसे द्यावे आणि त्यांना दैनंदिन जीवनात नवीन कौशल्ये कशी शिकवावीत यावर विशेष भर देण्यात आला आहे.

फोटो क्रेडिट: डब्ल्यूएचओ / ब्लिंक मीडिया - डी. वलेन्सिया

Self-paced
Language: मराठी
Not disease specific

Course information

हा कोर्स, विशेषत: संवाद आणि सामाजिक परस्परसंवादाच्या क्षेत्रातील विकासात विलंब किंवा अपंगत्व असलेल्या २ ते ९ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. निदान आवश्यक नाही. काळजीवाहकांच्या सर्वांगीण आरोग्यात सुधार करण्यासोबतच मुलांचा संवाद, क्रीयाकालापांमधील सहभाग, सकारात्मक वर्तन आणि दैनंदिन जीवनात कौशल्य विकसित करण्याच्या संधी म्हणून, दैनंदिन खेळ आणि घरगुती नित्याक्रमाचा वापर करण्याची काळजी वाहकांची क्षमता वाढवणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे. हा कोर्स विकासात्मक विलंब किंवा अपंगत्व असलेल्या मुलांच्या कुटुंबांसाठी डब्ल्यूएचओ चा काळजीवाहाकांसाठीचा कौशल्य ई-प्रशिक्षण कार्यक्रमावर आधारित आहे.

हा कोर्स कसा वापरावा कोर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी परिचयापासून सुरुवात करणे आणि नंतर क्रमाने मॉड्यूल पूर्ण करणे उपयुक्त ठरेल. याचे कारण म्हणजे कौशल्ये एकमेकांवर आधारित असतात. प्रत्येक मॉड्यूलसाठी, तुम्हाला तुमच्या मुलासोबत घरी सराव करण्यासाठी विशिष्ट कौशल्ये आणि पद्धती दिल्या जातील. तुम्ही दर ४ किंवा ५ दिवसांमध्ये एक मॉड्यूल पूर्ण करावे असे आम्ही सुचवतो जेणेकरून तुम्हाला त्या दरम्यान सराव करण्याची संधी मिळेल. याचा अर्थ अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी सुमारे २.५ महिने लागतील. तुम्ही लिखित क्रियाकलापांसाठी आणि योजना तयार करण्यासाठी आणि तुमच्या घरच्या सरावातून तुम्ही काय शिकलात याची नोंद करून ठेवण्यासाठी कोर्ससोबत दिलेले जर्नल वापरा. मॉड्युल्स तुम्हाला याबाबत मार्गदर्शन करतील. या कोर्सच्या "डॉक्युमेंट" विभागात उपलब्ध असलेले जर्नल तुम्ही प्रिंट करू शकता किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वापरू शकता. कोर्सच्या परिचयात आणि जर्नलमध्ये अतिरिक्त सूचना दिलेल्या आहेत.

अभ्यासक्रमाचा कालावधी: अंदाजे ८ तास.

प्रमाणपत्रे: परीक्षेनंतर किमान ८०% मिळवणाऱ्या सहभागींना कामगिरीचे प्रमाणपत्र जारी केले जाईल. ज्या सहभागींना कामगिरीचे प्रमाणपत्र मिळेल ते या कोर्ससाठी ओपन बॅज देखील डाउनलोड करू शकतात. कसे ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

हा कोर्स "WHO eLearning Caregiver Skills Training for Families of Children with Developmental Delays or Disabilities", 2022 वरून मराठीत भाषांतरित करण्यात आलेला आहे. मजकूर किंवा भाषांतराच्या अचूकतेसाठी WHO जबाबदार नाही. इंग्रजी आणि मराठी भाषांतरात काही विसंगती आढळल्यास मूळ इंग्रजी आवृत्ती ही बंधनकारक आणि अस्सल आवृत्ती मानली जाईल.

What you'll learn

  • दैनंदिन क्रियाकलापांचा आनंद घेत आणि सामायिक करुन आपल्या मुलाशी संपर्क साधण्याचे मार्ग समजावून सांगा.
  • तुमच्या मुलाला संवाद साधण्यात आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे मदत करू शकता हे समजावून सांगा.
  • तुमच्या मुलाला सकारात्मक वर्तन अधिक आणि आव्हानात्मक वर्तन कमी करण्यात तुम्ही कशाप्रकारे मदत करू शकता ते समजावून सांगा.
  • तुमच्या मदतीने तुमच्या मुलांना दैनंदिन जीवनासाठी कौशल्ये शिकण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे मदत करू शकता ते स्पष्ट करा.
  • तुमच्या स्वतःचे निरोगी आरोग्य आणि स्वास्थ्य सांभाळण्यासाठी वापरू शकता अशा मार्गांचे वर्णन करा.

Course contents

  • कोर्सची माहिती:

    कार्यक्रमाची रूपरेषा
  • मॉड्यूल १: मुलांना गुंतवून ठेवणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: तुमच्या मुलाची कसबे आणि आव्हाने कशी जाणून घ्यावी; तुमच्या मुलाला कोणते क्रियाकलाप आवडतात हे कसे शोधावे; आणि क्रियाकलापांदरम्यान तुमच्या मुलाच्या वागण्याकडे कसे लक्ष द्यावे.
  • मॉड्यूल २: मुलांना गुंतवणे तसेच चालू ठेवणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: तुमच्या मुलाशी गुंतून राहण्यासाठी वातावरण कसे तयार करावे; आणि कसे तुमच्या मुलासमोर जावे आणि सहभाग वाढवण्यासाठी तुमच्या मुलाला पर्याय कसे द्यावे.
  • मॉड्यूल ३: मुलांना गुंतवून ठेवणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: विकासात्मक विलंब आणि अपंगत्व याबद्दलची अधिक माहिती; लोकांमध्ये असलेले गैरसमज; आणि तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी सहभाग सामायिक करण्याचे महत्त्व.
  • मॉड्यूल ४: मुलांना परस्परसंवादात गुंतवून ठेवणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: तुमच्या मुलासोबत मजेदार आणि सकारात्मक क्रियाकलापांचा सराव कसा करावा; तुमचे मूल कधी प्रेरित होते हे कसे पाहावे आणि एखादा क्रियाकलाप त्याला आवडतो की नाही हे कसे ओळखावे; आणि चांगल्या वर्तनाकडे कसे लक्ष द्यावे आणि क्रियाकलापांदरम्यान तुमच्या मुलाचे कौतुक कसे करावे.
  • मोड्यूल ५: मुलांना खेळ आणि घरगुती नित्यक्रम/रुटीन सामायिक करण्यात मदत करणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: तुम्ही तुमच्या मुलासोबत दररोज करू शकता असे खेळ आणि घरगुती नित्यक्रम कसे तयार करावे; तुमच्या मुलाशी कसे गुंतून राहावे आणि नित्याक्रमातील गुंतवणूक कशी सामायिक करावी; आणि तुमच्या मुलाचे सामायिक क्रियाकलापांमधील स्वारस्य कसे कायम ठेवावे.
  • मॉड्यूल ६: मुलांना खेळाच्या नित्यक्रमात सहभागी होण्यास मदत करणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: तुम्ही तुमच्या मुलासोबत करू शकता असे खेळाचे नित्यक्रम कसे तयार करावे; तुमच्या मुलाचे क्रियाकलापांमधील स्वारस्य कसे टिकवून ठेवावे आणि तुमच्या मुलास सामायिकपणे गुंतून राहण्यात अधिक वेळ घालवण्यात कशाप्रकारे मदत करावी; आणि तुमच्या मुलासोबत खेळताना येणाऱ्या अडचणींचा कसे सामोरे जावे.
  • मॉड्यूल ७: संवाद समजून घेणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: मुलांचे शब्द न वापरता संवाद साधण्याचे मार्ग; आणि दैनंदिन क्रियाकलापांमध्ये मुलांचे संवाद कसे शोधावे, ऐकावे आणि त्यास प्रतिसाद कसा द्यावा.
  • मॉड्यूल ८: संवादास प्रोत्साहन देणे:

    या मॉड्युलमध्ये तुम्ही शिकाल: मुले समायिक करण्यासाठी संवाद साधत आहेत की मुले एखादी गोष्ट मागण्यासाठी संवाद साधत आहेत हे समजून घेण्यासाठी कसे पहावे आणि ऐकावे; तुमच्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये संवादाच्या संधी कशा निर्माण कराव्या; आणि तुमच्या मुलाच्या संवादाकडे कसे लक्ष द्यावे आणि त्यास प्रतिसाद कसा द्यावा.
  • मॉड्युल ९: लहान पायऱ्यांमध्ये नवीन कौशल्ये शिकवणे आणि मदतीचे स्तर:

    या मॉड्युलमध्ये तुम्ही शिकाल: कपडे घालणे आणि हात धुणे यासारख्या मोठ्या कामांना छोट्या पायऱ्यांमध्ये कसे तोडावे; पहिले कोणती लहान पायरी शिकवावी ते कसे निवडावे; तुमच्या मुलाला पायऱ्या शिकण्यात मदत करण्यासाठी तुम्ही पुरवू शकता अशा मदतीचे विविध स्तर; आणि तुमच्या मुलाला खेळण्यासाठी आणि घरच्या नित्यक्रमात आवश्यक असलेली सर्वात खालच्या स्तरावरील मदत कशी देऊ करावी.
  • मॉड्यूल १०: तुमच्या मुलाचे वर्तन समजून घेणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: आव्हानात्मक वर्तन वापरून मुले आपल्याला पाठवण्याचा प्रयत्न करत असलेले संदेश कसे समजून घ्यावेत; आणि आव्हानात्मक वर्तन रोखण्यासाठीचे मार्ग.
  • मॉड्यूल ११: आव्हानात्मक वर्तन रोखणे - मुलांना गुंतून रहाण्यात आणि रेग्युलेटेड राहण्यास मदत करणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: मुलांना रेग्युलेटेड (शांत, थंड आणि शिकण्यासाठी तयार) राहण्यास कशी मदत करावी; आणि आव्हानात्मक वर्तन समजून घेण्याचे आणि प्रतिबंध करण्याचे मार्ग.
  • मॉड्यूल १२: आव्हानात्मक वर्तनाची कारणे समजून घेणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: तुमच्या मुलाला पुढे काय होत आहे हे समजावे यासाठी आणि क्रियाकलाप बदलण्याची तयारी करण्यासाठी चित्रांचा वापर कसा करावा; आणि आव्हानात्मक वर्तन कमी करण्यासाठी कसा प्रतिसाद द्यावा हे समजून घेण्यासाठी आव्हानात्मक वर्तनाचे कारण कसे शोधावे.
  • मॉड्यूल १३: आव्हानात्मक वर्तनाला पर्यायी शिकवणे:

    या मॉड्यूलमध्ये, तुम्ही आव्हानात्मक वर्तनाची कारणे कशी समजून घ्यावी आणि आव्हानात्मक वर्तन कमी करण्यासाठी त्या वर्तनास प्रतिसाद कसा द्यावा याबद्दल अधिक माहिती जाणून घ्याल.
  • मॉड्यूल १४: चालू सराव आणि उद्दिष्ट ठरविणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही शिकाल: तुम्ही आणि तुमच्या मुलाने केलेल्या प्रगतीबद्दल अधिक माहिती; तुमच्या मुलाच्या संवादासाठी नवीन उद्दिष्टे कशी ठरवायची; आणि नवीन पायऱ्या जोडून आणि नित्यक्रम एकत्र जोडून तुमचा नित्यक्रमाचा विस्तार कसा करावा.
  • मॉड्यूल १५: समस्या सोडवणे आणि स्वतःची काळजी घेणे:

    या मॉड्यूलमध्ये तुम्ही तणाव आणि स्वत: ची काळजी घेणे आणि समोर येणाऱ्या समस्यांवर उपाय कसे शोधावे याबद्दल शिकाल.

Enroll me for this course

The course is free. Just register for an account on OpenWHO and take the course!
Enroll me now

Certificate Requirements

  • Gain a Record of Achievement by earning at least 80% of the maximum number of points from all graded assignments.